माझ्या देहांत तूं देहरूप माझ्या भवती तूं विश्वरूप
माझ्या अधरीं स्मरणरूप माझ्या श्रवणीं कीर्तनरूप
मौनांत माझ्या मननरूप माझ्या नयनीं गगनरूप
माझ्या कृतित तूं कर्तारूप माझ्या उक्तित तूं वक्तारूप
माझ्या भोगांत प्रसादरूप जरा-व्याधीत तूं कालरूप
माझ्या यशात ऐश्वर्यरूप अपयशात अंकुशरूप
दुर्जनांत तूं प्रच्छन्नरूप सज्जनांत तूं प्रसन्नरूप
श्रद्धेत माझ्या अभयरूप अनुभवांत प्रत्ययरूप
माझ्या अंतरीं तुझें स्वरूप शून्य-अनन्त अन्योन्यरूप
No comments:
Post a Comment