रोज करितो अंघोळ सरला जो भूतकाळ त्याचे नांवे
शिरावरुनि जलौघ सांडतो तसा कालौघ पायतळीं
मीं
काल होतो मेलो आज पुनरपि झालो शुचिर्भूत
मला
न माझें सूतक कारण मीं न पृथक नामरूप
अवकाश ज्याचा श्वास तिन्ही काळ ज्याचा ग्रास सोऽहमस्मि
सोऽहम्-रस
प्राशूनि गेलोचि मीं विसरूनि स: कोण कोण अहं !
No comments:
Post a Comment