सुस्नात शुचिर्भूत लेऊनि वस्त्रे धूत
निजलें शान्त तृप्त जैसें तान्हुलें
तैसे बाळे लहान जाहले संतजन
सांडूनि थोरपण तुज ठायीं
देहाच्या बाळलीला मनाचिया खेळा
बघसि तूं
वडिला कौतुकें किती !
ते
निश्चिन्त
निष्कम्प ते निर्मळ निष्पाप
ज्यांसि तूं
मायबाप वत्सलमूर्ति
निजलें जणु
बाळ निजरूप निर्मळ
देहपण केवळ काजळबोट गालीं
No comments:
Post a Comment