अता शहाणे नको बहाणे
माझा मला असायालामीं मोकळा
बन्ध बेगडी तोल तागडी
तोडायाला मोडायालामीं मोकळा
नांव ओळख भाव पृथक
सीमिताला लंघायालामीं मोकळा
धर्म नि देश दम्भ नि द्वेश
ह्या शृंखला भंगायालामीं मोकळा
गेलें घडून तें विसरून
क्षण आला जगायालामीं मोकळा
अनागार मीं मुक्तभार मीं
आकाशाला स्पर्शायालामीं मोकळा
जगरहाटी सांडून खोटी
जगताला वंदायालामीं मोकळा !
No comments:
Post a Comment