टिच् भर खोली खोलीला कुलुप
कुलुप माझिया ममत्वाचें रूप
टिच् भर खोली थिटेंच अंगण
दोनचार झाडे अस्वस्थ राखण
फुला-फळांवर स्वामीत्वाचा हट्ट
असूया मत्सर अधिकच घट्ट
अंगणाभोवती काटेरी कुंपण
कुंपण आखितें मीं-पण तूं-पण
अंगण कुंपण सीमित जीवन
पल्याड धरणी पल्याड गगन
No comments:
Post a Comment