उषेसंगे जाग
यावी संध्येसवे मालविण्या
फुलासवे
उमल्याव्या आणि मिटाव्या पापण्या
असण्याने माझ्या
कुठें नुमटावा ओरखडा
गुणधर्म हा
देहाचा पुरे भाकरतुकडा
येता जाता श्वास
माझा लयलीन तरंगावा
हिमकण अलगद्--
देह वितळून जावा
असण्याने माझ्या
कुठें नुमटावा ओरखडा
नसण्यानेहि
भिजाव्या न कुणाच्या नेत्रकडा
No comments:
Post a Comment