इन्द्रायणी अशी
उदास
व्याकुळ
भिजलें काजळ
जणु
आंसवांत
कसा
हो कर्दमीं रुतला प्रवाहो
हृदयीचा टाहो
कण्ठांत कोंडला
आनन्दाचें डोहीं विषाचे तवग
देखोनि दुभंग जिव्हार संतांचें
कुजतें जळ हें
देखवेना डोळां
कुणि गा नासला
पान्हा माउलीचा ?
की, कालिया कुणि जळीं ह्या दडूनि
गरळ जीवनीं बसे कालवाया ?
जळचरे आर्त दग्ध वनचरे
कातर पांखरे नाही दाणा पाणी
इन्द्रायणीकाठीं जीव हा विकल
का जगीं विट्ठल
उरलाच नाही ?
No comments:
Post a Comment