करपात्री कफल्लक मीं ओंजळीत अलख घेऊन फिरतो
महावस्त्र दशदिशा नाही झोळी नाही खिसा ओझें न कांही
पदीं धरणी लोळते मस्तकीं लखलखतें अन्तरिक्ष
जरा
मरण वा व्याधि कायागत ह्या उपाधि भोगते काया
कायेचें तें
भोगी काया काय तेथ जाई वाया मुळीं अपुलें !
नवा
क्षण नवा जन्म हेंचि अमृताचें मर्म मर्त्य देहीं
मीं
आनन्द मींच सत्य मीं अस्तित्वाचें सातत्य मृत्युंजय !
No comments:
Post a Comment