Sunday, April 21, 2013


देह धारण     देह पोषण व्रताचरण   हें अहिंसा 

देह लालन देह पीडन अतिक्रमण ती हिंसा

देहाचें  भाडें लागतें थोडें द्यावें तेवढें ती अहिंसा

पोट भरलें धर्म्य सेविलें वर चोचले ती हिंसा

मांसभक्षण शाकसेवन वृथा भाण्डण वाद हें की तें

जें जें पोषक जें जें तारक तें तें सात्विक असो कांही

ह्याची आवड त्याची नावड ।  सर्वचि कोड मीं-पणाचें

ऐसें मीं-पण हिंसा कारण मोकळेंपण ती अहिंसा

अन्नवसन अटळ ॠण जगाकडून घ्यावें लागतें

मितुलें घ्यावें तोष मानावे आणि असावें कृतज्ञ सदा

जें कांहि घ्यावें वर्धूनि द्यावें उॠण व्हावें यथाशक्ति

माझी जीविका कुणाहि एका निमित्त दु:खा होऊ नये

जीवनहेतु शुभं भवतु अखण्ड ॠतु- चक्र चालावें

 

 

No comments:

Post a Comment