पंढरीचे वारकरी आर्त आम्ही हजकरी
खूण रंग वनश्रीचा ध्वजा उषेची अंबरीं
दयाळ तो रहमान वाळवण्टांत निर्झरी
श्वास ज़िक़्र अल्लाहचा ओठीं पाण्डुरंग हरि
मूर्तास नामे सहस्र अमूर्तीं मूक वैखरी
रब-उल्-आलमीन एक मक्केत वा विटेवरी
वैष्णवांची उम्मत ही विश्व एक बिरादरी
वारकरी हजकरी भेट घडे उराउरी !
No comments:
Post a Comment