नच लेक गेली दूर
आज घर झालें मोठें
माझ्या अंगणाला फुटें
अंगण विश्वाचें
देश - प्रान्त ओलाण्डून
लंघून सकळ वेशी
भेद सारे मिटविसि
तूं आप --पर
आज तुझ्यामुळे माझें
माझें -पण विस्तारलें
माझ्या झिजण्याला दिलें
तूं भाग्य चन्दनाचें
माझ्या क्षितिजापल्याड
जा पोरी जा झेपाऊन
न्याहाळेन मीं इथून
आभाळ अथांग
रणरण नभाखाली
मीं चाललो वाटसरू
तव शिरीं कल्पतरु
करू दे छाया
दूर जातांना माणसें
जवळ येतात मनें
दृढतर ही बंधनें
वेदना तरल…
No comments:
Post a Comment